वट पौर्णिमा संपूर्ण पूजा विधी ,साहित्य,शुभ रंग ,शुभ मुहूर्त ..

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

वट पौर्णिमेची साधी सोपी पूजा कशी करायची ते मी आज सांगणार आहे, तर सर्वात अगोदर ज्येष्ठ पौर्णिमा हि वट पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात.पुरातन कथेप्रमाणे सावित्री ने यमा सोबत चर्चा आणि आपल्या नवऱ्याची सेवा ही वडाच्या झाडाखाली केली आणि यमा कडून आपल्या पतीचे प्राण परत आणले.म्हणूनच वट पौर्णिमेला सुवासिनी वट वृक्षाची पूजा करतात. सुवासिनी ने पिवळा रंग ,लाल रंग , गुलाबी रंग या रंगाची साडी परिधान करावी .आपल्या लग्नाची साडी असेन तर अती उत्तम. आणि काळी पांढरी साडी शक्यतो नेसू नये.

 शुभ मुहूर्त 3 जून 2023 शनिवार 

वट पौर्णिमा सकाळी आणि दुपारी शुभ मुहूर्त आहे.

सकाळी 7.07 वाजल्यापासून ते 8.51 पर्यंत.हा शुभ आणि उत्तम मुहूर्त आहे

आणि दुपारी 12 .19 ते संध्याकाळी 5.31 मिनट पर्यंत मुहूर्त   आहे आणि वडाच्या झाडाला फेरी मारताना तुम्ही हा मंत्र म्हणावा .

वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन

वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्निता ||.


अगोदर वडाच्या झाडाचे महत्त्व जाणून घेवू.




 1) वडाच्या झाडाचे महत्त्व=

वडाचे झाड हे दीर्घायुष्य असते.

वडाच्या झाडाच्या मूळांमध्ये ब्रह्मा , झाडामध्ये विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान शिवाचा वास असतो.म्हणून हे झाड त्रिमृर्तींचे प्रतीक मानले जाते .


2) पुजे साठी लागणारे साहित्य=

सौभाग्याचे लेणे

हळदी कुंकू

कापसाचे वस्त्र 

विड्याची पाने 2

1 सुपारी

ताट 

तांब्या भरून पाणी

साखर 

पाच फळे

नारळ ब्लाऊस पिस

पाच सुवासिनी ची ओटी भरायला 

पाच आंबे आणि गहू 

दिवा,धूप , अगरबत्ती, कापूर ,

पंचामृत किंवा दुध ,

सुताचा धागा 

गूळ खोबरे इत्यादी...


3) वट पौर्णिमेची पूजा कशी करायची= वट पौर्णिमेला सुवासिनी व्रत करतात .काही पूर्ण वेळ करतात तर काही पूजा करेपर्यंत. तुमची जशी प्रथा असेन तसे करावे . सकाळची आपली नित्य क्रम करून ,देवाची पूजा करून ,आपल्याला वडाच्या झाडाखाली पूजा करायला जायचं आहे.आपल्याला संकल्प करायचा आहे की माझ्या पतीला आणि माझ्या परिवाराला दीर्घ आयुष्य ,निरोगी आयुष्य दे.आणि मग आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे . हळद कुंकू ,फुले ,अक्षता अर्पण करायची आहे.कारण कोणतीच सेवा ही दीप प्रज्वलित केल्याशिवाय पूर्ण होत नाही .त्यानंतर आपल्याला दोन विड्याची पाने एकत्र घेवून त्यावर गणपतीची ही स्थापना करायची आहे. कारण कोणतीही पूजा करताना गणपती बाप्पा ची पूजा करणे अनिवार्य आहे. हळद ,कुंकू , फुले,अक्षता, दाखवून आपल्याला बाप्पा चा आशिर्वाद घ्यायचा आहे. गूळ ,खोबरे,साखर यांचा नैवद्य दाखवायचा आहे.

त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला पाणी घालायचे आहे. त्यानंतर दूध किंवा पंचामृत ही घालायचे आहे. आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. हळद ,कुंकू ,अक्षता,फुले, वाहायचे आहे.आणि आणि वडाला फुलांचा हार ,कापसाचे वस्त्र घालायचे आहे.


त्यानंतर तुम्हाला धागा ,दोरा घ्यायचा आहे आणि तो वडाच्या फांद्याला अडकून तुम्हाला 7 किंवा 3 वडाच्या झाडा भोवती फेऱ्या मारायच्या आहेत. 


त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे. नारळ बलाऊस पिस घेवून नारळ वर हळद कुंकू अक्षता वाहून आपण जशी ओटी भरतो तशी च ओटी भरायची आहे.सौभाग्याचं लेण ही ओटीत ठेवायचे आहे.आणि कोणतीही पाच फळे ही तुम्हाला सुवासिनीच्या ओटी मध्ये घालायची आहेत.

किंवा आंबे आणि गहू ने ही ओटी भरली तरी चालेनं.

त्यानंतर वट वृक्षाची आरती करावी. वट सावित्री ची कथा वाचावी, धूप, दीप ,अगरबत्ती दाखवावे.आणि गोडा धोडाचा नैवद्य दाखवावा. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी,निरोगी आरोग्यासाठी,सोबत आपल्या परिवाराच्या ही दीर्घ ,निरोगी आयुष्यसाठी प्रार्थना करावी.


श्री स्वामी समर्थ

स्वामी भक्त स्वामीमय होवूयात..

अशक्य ही शक्य करतील असे 🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...