श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
स्वामी भक्त स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत.हीच स्वामी चरणी प्रार्थना.🙏
स्वामी भक्त आज मी तुम्हाला 11 दिवसांची गुरुपोर्णिमेनिमित्त महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा सांगणार आहे.या सेवेने तुम्हाला सांगते की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला भेटेन.
नोकरी साठी, घरासाठी, लग्नासाठी, तुम्ही ही विशेष अशी महाराजांची सेवा करून शकता. आपल्या भक्ताच कल्याणासाठी महाराज हे नेहमी तत्पर असतात.सगळ्या संसाराचा भार स्वामीं वर आहे.महाराजांचं आपल्या कडे लक्ष आहे.
त्यांच्या कृपेचा लाभ होण्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे
गुरुपौर्णमेनिमित्त महाराजांची विशेष सेवा
१) सेवेला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे.तर असे म्हणतात की महाराजांची कोणतीही सेवा ही संकल्पा शिवाय पूर्णच होत नाही.तुम्ही संकल्पा शिवाय सेवा केली तर त्याच फळ तुम्हाला मिळणार नाही.म्हणूनच तुम्हाला संकल्प करायचा आहे.
2) महाराजांना संकल्प कसा करावा?
सेवेच्या पहिल्या दिवशी हा संकल्प करायचा आहे.तुम्हाला महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसायचे आहे.आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे.आणि डाव्या हाताने उजव्या हातामधे तुम्हाला ते पाणी घ्यायचे आहे आणि तीन वेळा तुम्हाला
ॐ केशवाय नम:
ॐ नारायणाय नमः
ॐ माधवाय नमः
असे बोलून तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचे आहे.
त्यांनतर पुन्हा तुम्हाला हातात पाणी घ्यायचे आहे आणि हाताखाली तूम्हाला ताम्हण ठेवायचे आहे आणि हातावर तुम्हाला पाणी,अक्षता आणि फुल घ्यायचे आहे.आणि संकल्प करायचा आहे की महाराज आज पासून मी 11 दिवसांची तुमची तुमचे नाव (______) माझे गोत्र(______) सेवा करणार आहे. तुम्हीच माझे कर्ता आणि करविता आहात. तुम्हीच आता माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या.आणि तुम्हाला ताम्हणात पाणी सोडायचे आहे.
रोज तुम्हाला संकल्प करायचा नाही आहे.
3) आपल्याला करावयाच्या सेवा=
1 ) तुम्हाला सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अगोदर स्वामी स्तवन बोलायचे आहे
२)स्वामी चरित्रसारामृत चे 21 अध्याय
तुम्हाला रोज एक पाठ करायचा आहे
3) 11 माळी श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे
4) 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे.
आणि ही सेवा करताना तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवायचे विसरू नका कारण हे तीर्थ तुम्हाला पूजा झाल्यानंतर सगळ्या घरात तुळशीच्या पानाने शिंपडायचे आहे.आणि घरातील सगळ्यांनी ते ग्रहण करायचे आहे.
*आता आपण गुरुपौर्णिमेला महाराजांना गुरुपद कसे द्यावे ते पाहणार आहोत.
गुरुपौर्णिमेला तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. आणि तुमची सगळी नित्य कर्मे आटोपून तुम्हाला महाराजांन जवळ बसायचे आहे.
तुमच्या जवळ महाराजांचा मूर्ती असेन तर त्या मूर्तीला तुम्हाला अगोदर जल अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग महाराजांना पुन्हा अष्टगंधाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्त आणि 16 वेळा श्री सुक्त बोलायचे आहे आणि नाही जमले तर कमीत कमी 1 वेळा तरी नक्की बोला .
त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. आणि मग त्यांना आसनस्थ करायचे आहे. महाराजांना त्यांचं आवडते हिनाअत्तर लावायचे आहे.आणि अष्टगंध लावायचा आहे. आणि आपल्याला दिवा , अगरबत्ती ,लावायची आहे. फुल वाहायची आहेत.
आता आपण महाराजांना गुरुपद द्यायचे आहे.
एक नारळ आणि त्यावर गुलाबाच फुल घ्यायचं आहे आणि तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की महाराज मी आज मनापासून तुम्हाला माझा गुरु मानतो.तुम्ही च माझे माता,पिता गुरू आहात,मी चुकलो तर मला दिशा दाखवा.प्रसंगी आई सारखं शिक्षा द्या ,पण माझा हात तुम्ही सोडू नका.जीवनाच्या या वाटेवर मला तुमची साथ हवी आहे.,तुम्ही च कर्ता आणि करविता आहात.तुम्ही ब्रम्हांडनायक आहात.,सगळी सृष्टी तुमच्या आज्ञेनेच चालते .मी आजन्म तुमची सेवा करणार आहे. स्वामी राया तुम्ही ही सेवा माझ्या कडून करू घ्या आणि माझा शिष्य म्हणून स्वीकार करा तुम्ही नारळ आणि गुलाब घेवून मठ किंवा केंद्रामध्ये ही जावू शकता पण शक्य नसेन तर अश्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही महाराजांना गुरूपद देवू शकता.
11 दिवसांची सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेला सुद्धा करायची आहे .आणि 11 दिवस रोज तुम्हाला तुम्ही घरात जे काही बनवाल त्याचा नैवेद्य स्वामीं पुढे ठेवायचा आहे.
11 दिवसात मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे. आणि पूजेची सांगता ही अगदी सोपी आहे. तुम्ही स्वामींना मनापासून सेवा करून घेतली म्हणून त्यांचे आभार माना.आणि गोडाचा नैवेद्य करा,आरती करा. स्वामींना नैवेद्य दाखवा.
अश्या पद्धतीने तुम्ही 11 दिवसांची सेवेची सांगता करू शकता
श्री स्वामी समर्थ
स्वामी भक्त स्वामीमय होवूयात
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏