स्वामींनी ना नवस कसा करावा

श्री स्वामी समर्थ.

सर्व प्रथम ,सर्व स्वामी भक्तांना माझ्या स्वामीमय शुभेच्छा.

स्वामींनी जश्या माझ्या सगळ्या इच्छा न मागता पूर्ण केल्या आहेत.तशा च तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना .





मी आज तुम्हाला श्रीस्वामी समर्थ यांना नवस कसा करावा ते सांगणार आहे.जेणेकरून स्वामी महाराज तुम्हाला लवकरच पावतील.आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

सगळेजण स्वामींनी ची सेवा करत आहेत अगदी खूप वर्षापासुन पण तरीही त्यांना प्रचिती आली नाही किंवा जे कोणी नवीन सेवेकरी आहे त्यांना स्वामींनी ची सेवा करायची आहे, तर माझा हा ब्लॉग त्यांच्या साठी आहे. आजच्या ब्लॉग चा एकच उद्देश आहे .की तुम्ही स्वामींनी ना नवस करून तुमची इच्छापूर्ती करावी.

स्वामींनी ना नवस करताना तुम्हाला सर्व प्रथम केंद्रात किना स्वामी मठात जायचे आहे. अणि तुमच्या घरा जवळ केंद्र नसेन मठ नसेन तरी काही हरकत नाही आहे. सर्वांच्या इथे केंद्र किंवा मठ असेन असे काही नाही .तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातील स्वामी मूर्ती किंवा फोटोसमोर एक नारळ , खडीसाखर,फुल घ्यायचे आहे.आणि स्वामींनी समोर बसायचे आहे. विश्वासाने त्यांना सांगायचं आहे.की  स्वामी समर्थ महाराज मी तुमची सेवा मग ती स्वामी चरित्र सारामृत पारायण असो किंवा 9 गुरुवार, 11 गुरुवार किंवा नित्य सेवा, मी ही सेवा सुरू करणार आहे, तर माझी हे सेवा तुम्ही माझ्याकडून करवून घ्या. आणि तुमची जी इच्छा असेन ती तुम्ही स्वामी महाराज यांना सांगावी , आणि माझी ही इच्छा तुम्ही करा महाराज असे बोलावे ही इच्छा कोणतीही असू शकते .जस की लग्नासाठी, घरासाठी., नोकरीसाठी, संतती साठी, त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा बोलून तो नारळ स्वामी चरणी अर्पण करावा, कर हा नारळ केंद्रात ठेवला असेन तर तो तिथेच राहून द्यावा, पण काही कारणाने तुम्हाला केंद्रात जने जमले नाही तर घरात स्वामी चरणी तो नारळ अर्पण करावा, जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईन तेव्हा तो नारळ फोडून तुम्ही त्याच काहीतरी गोड करून खाव.

स्वामी आपल्या भक्ताची निःस्वार्थ सेवा स्वीकार  करतात .तुम्ही फक्त विश्वासाने त्यांना शरण जावा.स्वामी आपले सगळे ऐकतात, तेव्हा आपल्याला सुध्दा बोलता आले पाहिजे स्वामींनी शी,

स्वामी तुमच्या सगळया इच्छा पूर्ण करो





श्री स्वामी समर्थ

स्वामी भक्त चला स्वामीमय होवुयात.

नयना खरात 

3 comments:

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...