श्री स्वामी समर्थ (अक्षय तृतीया पूजाविधी)
सर्व प्रथम सर्व स्वामी भक्तांना अक्षय तृतीयेच्या स्वामीमय शुभेच्छा. स्वामीं च्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद येवो.
आपल्या सर्वांनाच माहित आहे. की अक्षय तृतीया हा साडेतीन महुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे.अक्षय तृतयेला जे काही आपण दान, धर्म करू ते अक्षय होत असतं.आणि आपल्याला जे पुण्य मिळतं.ते कधीही नष्ट होत नाही. अक्षय तृतीया हा दिवस विष्णूसाठी समर्पित आहे.आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुध्दा खूप काही सेवा या दिवशी करतात.तसेच पितरांची सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
आपण पाहूयात की या दिवशी पितरांची सेवा कशी करतात.तर अक्षय तृतीयेला आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांची सेवा करण्यासाठी मातीचे मडके आणून त्यांची पूजा करतो.मातीचे मडके याच्या खाली गहू ची राशी केली जाते .त्यावर मडके ठेवतात. आणि मडक्यात पाणी भरून ठेवतात त्यात वाळा ही टाकतात.. आणि त्या नंतर मडक्याला रक्षा सूत्र बांधतात.आणि त्यावर खरबूज ठेवतात. मडक्याला चंदनाची पाच बोटे वरून खाली ओढावित. आणि नंतर त्याची .धूप, दिवा, अगरबत्ती दाखवून यथासांग पूजा करावी.आणि आंब्याचा, जेवणाचा नैवेद्य दाखवावा. आणि मनापासून प्रार्थना करावी आपल्या पूर्वजांची ते आपल्याला आशीर्वाद नक्कीच देतील. आणि आपल्याला जमलेच तर पितृस्तूती आणि पितृअष्टकंम स्तोत्रं नक्की बोलावे.
अक्षय तृतीया या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यक्रम करून रांगोळी काढावी.या दिवशी आपण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईन.आणि माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अगोदर भगवान विष्णु यांना प्रसन्न करावे लागेल.या दिवशी आपल्याला साग्रसंगीत स्वयंपाक करायचा आहे.आणि एखाद्या गरिबाला जेवू घालायचे आहे. अक्षय तृतीयेला पितरांची ही सेवा करतात.म्हणून एक नैवेद्य आपल्याला कावळ्याला द्यायचा आहे.जेणेकरून जेव्हा कावळा तो नैवद्य भक्षण करेन आणि आपल्याला आशीर्वाद देईन आणि आपले पितर तृप्त होतील. आणि पितृदोष निघून जाईन. आणखी एक. नैवद्य आपल्याला गायी साठी ठेवायचा आहे. जेणेकरुन 33 कोटी देव आपल्यावर प्रसन्न होतील.आणि स्वामीभक्त आपल्याला गोमातेच्या अंगावरून हात फिरवून पितरांसाठी प्रार्थना करायची आहे. आणि पिंपळाच्या झाडाखाली जावून पितरांना मुक्तिदे म्हणून बोलायचे आहे.या सगळ्यामुळे आपले पितर ही तृप्त होतील आणि आपल्यावर त्यांचा सदा आशीर्वाद राहीन.
अश्या प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेला पितरांची. विष्णू जिंची आणि माता लक्ष्मी ची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा हीच स्वामी चरणी प्रार्थना.
आणि काही अजून प्रश्न असेन तर कॉमेंट करावी मी नक्की प्रतिसाद देईन
स्वामीभक्त स्वामीमय होवूयात.
नयना सचिन खरात.
No comments:
Post a Comment