स्वामींची नित्यसेवा

 स्वामीभक्त स्वामी कृपेने तुम्ही सगळे ठीक च असणार आहात.कारण स्वामी आपल्या भक्तांच रक्षण नेहमी च करत असतात.सर्व स्वामी भक्तांनचा मला नेहमी एकच प्रश्न असतो. की आजच्या धावपळीच्या काळात कोणाकडे जास्त वेळ नाहीये.तर अश्या परिस्थिती मध्ये आम्हाला खूप वाटते की स्वामींची सेवा करावी पण वेळे अभावी ते शक्य होत नाही.तर काय करावे की कमी वेळात आम्हाला पण सेवा करता यावी.

स्वामीभक्त खर तर आपले स्वामी हे खूप च गोड आहेत.तुम्ही फक्त स्वामी नामाचा जप केला तरी ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे असतात.तर आज मी तुम्हाला स्वामींची सगळ्यात सोपी सेवा सांगणार आहे.आणि ती सेवा करण्याची वेळ मात्र एकच असावी .कोणतीही वेळ तुम्ही निवडू शकता पण प्रयत्न करा की रोज त्याच वेळी पूजा सुरू व्हावी.




स्वामीभक्त तुम्हाला काय करायचे आहे तर सर्व प्रथम तुम्हाला महाराजांच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसायचे आहे आणि दिवा  ,एक अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे आणि पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे. आणि स्वामींनी ना बोलायचे आहे. हे स्वामी सेवा मी तुझी मनापासून सेवा करतोय .माझी ही सेवा तू स्वीकारावी.





आणि तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. काहींना 11 माळी शक्य नसेन हरकत नाही त्यांनी एक माळ जप करावा.आपण जप किती करतो हे महत्वाचं नसते तर जप किती मनापासून करतो हे महत्वाचं असतं. आणि 11 वेळा स्वामीं चा तारक मंत्र आपल्याला बोलायचे आहे.तर 11 वेळा बोलणं शक्य नसेन हरकत नाही,आपण एक वेळ ही बोलू शकतो.शेवटी श्रध्दा महत्त्वाची आहे. सगळे झाले की महाराजांची आरती करावी.उदी कपाळाला लावावी आणि ग्लास भरून जे पाणी आहे. ते घरातील सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यावे.

स्वामी तुमचे रक्षण करोत.हीच स्वामी चरणी प्रार्थना

स्वामीभक्त स्वामीमय होवूयात

या ब्लॉग चा उद्देश कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही आहे.

नयना सचिन खरात 


No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...