श्री स्वामी समर्थ
सर्व स्वामी भक्तांना माझ्या स्वामीमय शुभेच्छा.आपल्या सर्वांना स्वामींची भक्ती ,सेवा करायला खूप आवडते. पण वेळेअभावी काहींना ही सेवा करता येत नाही.आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्याला ही सेवा करता येत नाही .माहित आहेस्वामी मला.पण या कलियुगात आपल्याला स्वामीं शिवाय पर्याय नाही आहे.स्वामींच्या कृपेमुळे च सर्व काही सुरू आहे.आपला संसार,जीवन ,
तर स्वामी सेवे शिवाय आपल्या जीवनात काही नाही .
ही सेवा त्या स्वामी भक्तांसाठी आहे .ज्यांना रोज 3 अध्याय, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र बोलता येत नाही .आपल्या लोकांनमध्ये काही सेवेकरी असेही आहे.की ज्यांना अस्वामी सेवाक्षर ओळख ही नाही.तर त्या सर्व स्वामी भक्तांसाठी ही सर्वात सोपी आणि खूप च प्रभावी अशी सेवा आहे.
या सेवेला उदबत्ती सेवा म्हणतात.
सर्व प्रथम आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे. किमान आपल्याला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे.आणि मूर्ती असेन तर तिला अभिषेक करायचा आहे.आणि मग अष्टगंध लावायचा आहे आणि हिना अत्तर जे स्वामींना अत्यंत प्रिय आहे ते लावायचे आहे.आणि दिवसातील कोणतीही वेळ जी तुम्हाला सोयीस्कर असेन ती वेळ तुम्हाला स्वामी सेवेसाठी निवडायची आहे.पण लक्षात ठेवा की एक च वेळ हवी. मग ती कोणतीही चालेन. आणि मग सेवेला सुरुवात करावी.सेवा करताना आपल्याल आसन घ्यायचे आहे. उदबत्ती लावावी आणि मनोभावे प्रार्थना करावी. तुम्ही ही सेवा का करत आहात.कशासाठी करत आहात. तुम्हाला काय पाहिजे ते सगळं तुम्ही महाराजांना सांगावं.अगदी मन
मोकळे पणाने सांगावं.स्वामी फार गोड आहेत .त्यांना फक्त आपली निःस्वार्थ सेवा हवी आहे.त्यांना पंचपक्कवान नको त्यांना श्रद्धे ने फक्त साखर जरी दिली तरी ते स्वीकार करतात.तर हे सगळ बोलून आपण उदबत्ती लावून ती पूर्ण जळे पर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे.हा जप आपल्याला हळूहळू करायचा आहे.एका लयीत .घाई गडबड न करता करायचा आहे. आणि हा जप करताना पाण्याचा एक ग्लास ही ठेवावा. उदबत्ती पूर्ण संपली की त्या उदबती ची रक्षा आपल्याला स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला लावायची आहे. आणि जो ग्लास ठेवला होता पाण्याचा तो घरातल्या सगळ्यांनी पिण्यासाठी घ्यावा. स्वामींची सेवा ही निष्ठेने करावी.मनात कोणताही पण आणु नये. आयुष्यात सगळ काही स्वामी इच्छेमुळे च होतय.स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.स्वामी सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत.
श्री स्वामी समर्थ
या ब्लॉग चा उद्देश कोणतीही
अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही आहे
स्वामीभक्त स्वामीमय होवूयात
अशक्य ही शक्य करतील स्वामी
नयना सचिन खरात
No comments:
Post a Comment