सर्व स्वामी भक्तांना माझ्या स्वामीमय शुभेच्छा. स्वामींच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद येवो.सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी पुर्ण करो.
तर आपण मागच्या ब्लॉग मध्ये आपल्या घराचा उंबरठा कसा असावा ते पाहिले होते. आता आपण उंबरठ्याची रोज पूजा कशी करायची आणि एखाद्या शुभ दिवशी , सण, व्रत वैकल्ये ,या दिवशी उंबरठयाची पूजा कशी करतात ते पाहुयात.
उंबरठयावर माता लक्ष्मी चा वास असतो.असे म्हणतात.पूर्वीच्या काळी लोक म्हणायची की उंबरठा नीट पुजला गेला तर घरात सुख समृद्धी नांदते.
उंबरठा हा मांगल्य आणि मर्यादेच प्रतीक मानले जाते. वाईट शक्ती फक्त उंबरठ्यामुळे आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक घराला एक उंबरठा असणे आवश्यक आहे.जरी घराच्या आत नसेल तरी चालेल .पण मुख्य दरवाजा ला उंबरठा असणे अनिवार्य आहे.
तर स्वामी भक्त या उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे.कारण इथे माता लक्ष्मी चा वास आहे.तर दररोज आपल्याला सर्व प्रथम सकाळी लवकर उठून उंबरठ्यावर पाणी टाकायचे आहे.कारण असे बोलतात की असे केल्याने आपले पितृदोष कमी होतात.नंतर आपल्याला एका कापडाने उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू उंबरठ्याच्या मध्यभागी व्हायचे आहे.तुम्ही तिथे स्वस्तिक ही काढू शकता.जर तुम्ही लक्ष्मी ची पावले उंबरठ्यावर लावली असतील तर तिथे ही तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता.आणि नंतर तुम्हाला अगरबत्ती दाखवून उंबरठ्याची पूजा करायची आहे.ही झाली दररोज ची पूजा.
आता आपण पाहणार आहोत की एखाद्या शुभ दिवशी, सण, व्रत वैकल्ये,किंवा तुमचा उपवास, अमावस्या , पौर्णिमा या दिवशी आपण उंबरठ्याची विशेष अशी खूप च प्रभावी आणि तुमच्या जीवनात विलक्षण आनंद,सुख समृद्धी,घेवून येणारी एक अत्यंत प्रभावी अशी सेवा पाहणार आहोत. ती सेवा म्हणजे
हळद लेपन( हळद होळी)
स्वामी भक्त हळद लेपन ही का करतात सर्व प्रथम आपण हे जाणून घेवू .
आपल्या घरात जेव्हा सतत भांडण असते,किंवा आजारपण असते. घरात एक प्रकारची निराशा जाणवत असते. आपल्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. माता लक्ष्मी स्थिर नाही. आणि जेव्हा काही लोक घरात येतात आपल्याला माहीत नसते की समोरची व्यक्ती कशी आहे .तिचा आपल्या बद्दल काय विचार आहे.तर अश्या लोकांमुळे सुध्दा आपल्या घरात एक नकारात्मकता येत असते.
उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते,घरात सकारात्मकता येते .सगळ छान होत.हा माझा व्यक्तीत अनुभव आहे.
तर स्वामी भक्त चला पाहुयात हळदी चे लेपन कसे करायचे?
हळदीचे लेपन करताना आपल्याला एका ताटात हळद आणि गोमूत्र घ्यायचे आहे .त्यांचे एकजीव असे मिश्रण करायचे आहे.आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण उंबरठ्याला लावायचे आहे.पूर्वीच्या काळी जसे शेण सारवायचो तसच आपल्याला छान असा हळदीने उंबरठा
सारवायचा आहे. हळद कुंकू ने स्वस्तिक काढायचे आहे. दारात रांगोळी काढायची आहे .मग तुम्हाला हळद कुंकू, दिवा, अगरबत्ती,फुले अक्षता वाहून पूजा करायची आहे .आणि संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर दिवा लावायचा आहे.आणि उंबरठ्याची मनोभावे पूजा करायची आहे.प्रार्थना करायची आहे.माझ्या घरातील सगळी नकारात्मकता जावू दे ,आजारपण , भांडण नको होवू दे , घरात पैसा,सुख समृद्धी येवू दे,सगळ्यांनी आनंदी राहू दे .
रोजच्या रोज तुम्ही उंबरठ्याची पूजा केली, आणि काही विशिष्ट प्रसंगी हळद लेपन केले तर स्वामी कृपेनं तुम्हाला लवकरच एक चांगली ऊर्जा घरात जाणवेल,वातावरण प्रसन्न राहील.सगळ्या नकारात्मक गोष्टी ही हळूहळू कमी होतील. तुम्हाला नक्कीच एक चांगला अनुभव येईन.
तुम्ही तुमचा अनुभव मला नक्की सांगा.
या ब्लॉग चा उद्देश कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही आहे.
श्री स्वामी समर्थ
स्वामी भक्त स्वामीमय होवूयात
अशक्य ही शक्य करतील स्वामी
नयना सचिन खरात
No comments:
Post a Comment