स्वामी सेवा ( उंबरठा कसा असावा)

 सर्व स्वामी भक्तांना माझ्या स्वामीमय शुभेच्छा 

 आजचा विषय आहे की  आपल्या घराचा उंबरठा कसा असावा ?

तर स्वामी भक्तांनो उंबरठा म्हणजे काय हो? उंबरठा म्हणजे मांगल्याचे प्रतीक,उंबरठा म्हणजे मर्यादा .... अगोदर च्या काळात लोक बोलायची की तुमचा उंबरठा चांगला पुजला गेला तर तुमच्या घरात सुख समृद्धी भरभरून राहीन. बाहेरील नकारात्म शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही.



 


आपल्या घराचा उंबरठा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हा लाकडाचा असावा, आणि त्यात सागवान , खैरा, चंदन, उंबराच झाड, या झाडांचा असावा.

आणि मार्बल, ग्रॅनाईट,जंगली झाडे,आणि काळा, पांढरा, असू नये. उंबरठ्याचा  बाहेरचा भाग सौर ऊर्जा ,आतला भाग चंद्र ऊर्जा आणि मधला भाग पृथ्वी ऊर्जेचा संतुलन करतो. आणि पूर्वीचे लोक म्हणतात की उंबरठयावर माता लक्ष्मी चा वास असतो. म्हणून आपल्या घरात उंबरठयाच खूप महत्त्व आहे. 

वास्तूशात्रानुसर उंबरठ्या खाली आपण चांदीची चपटी तार किंवा पंचधातूची तार ठेवली तर आपल्या वास्तूत सुख समृद्धी नांदते.

आपल्या घरात माता लक्ष्मी यावी, राहावी,स्थिर व्हावी, बाहेर जावू नये म्हणून उंबरठा बांधला जातो.




रोज सकाळी उंबरठा स्वच्छ पुसून घ्यावा.त्याची रोज हळद कुंकू लावून पूजा करावी.लक्ष्मी ची पावले उंबरठ्यावर लावावीत. रोज रांगोळी काढावी . संध्याकाळी रोज घराच्या बाहेर दिवा लावावा. जेणकरून लक्ष्मी प्रसन्न होवून घरात प्रवेश करेन.

पुढच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की उंबरठ्यावर  हळद होळी ,हळद लेपन कसे आणि कधी करावे

या पेज चा उद्देश कोणतीही अंधश्रध्दा पसरवण्याचा नाही आहे.


स्वामीभक्त स्वामीमय होवूयात

अशक्य ही शक्य करतील स्वामी


नयना सचिन खरात

No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...