स्वामींची नित्य सेवा कशी करावी

 सर्व स्वामी भक्तांना माझ्या स्वामीमय शुभेच्छा आज मी तुम्हाला महाराजांच्या नित्यसेवे बद्दल अजून विस्तारित माहिती देणार आहे.

मागे आपण ज्यांना महाराजांची सेवा करायची आहे पण वेळ नाही अश्या भक्तांसाठी मी साधी आणि सरळ सेवा सांगितली होती

आज मी सांगणार आहे थोड्या विस्तारित स्वरूपात सेवा कशी  करावी





तर  स्वामी भक्तांनो तुम्हाला काय करायचे आहे की महाराजांचा फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे.आणि मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे.आणि त्यांनतर तुम्हाला महाराजांना अष्टगंध लावायचा आहे.आणि त्यानंतर तुम्हाला महरांजाच अत्यंत प्रिय असे हिना अत्तर लावयच आहे .हिना अत्तर हे महाराजांना अत्यंत प्रिय आहे. हे अत्तर लावल्यावर महाराज खूप खुश होतात.





मग आपल्याला करायची आहे सेवा. तर नित्य सेवे मध्ये आपण स्वामीचारीत्र साराअमृत चे रोज चे 3 अध्याय असे पाठ करू शकता , पहिल्या दिवशी 1,2,3, दुसऱ्या दिवशी 4,5,6,असे क्रमाने 3 ,असे अध्याय आपल्याला करायचे आहे. आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे.

आणि 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे.

आणि सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन बोलून च सुरुवात करायची आहे सेवे ला.आणि त्यानंतर तुम्हाला अगोदर गणपतीची आणि मग स्वामींची आरती करायची आहे .मग तुम्हाला नैवैद्य दाखवायचा आहे. आणि स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे. सकाळी आणि संध्यकाळी स्वामीं ना मुजरा सुध्दा अत्यंत प्रिय आहे.

तुम्ही जे काही घरी बनवले असेन ते तुम्ही दाखवू शकता.आणि काहीच नाही जमले तर फक्त दूध किंवा खडी साखर ही तुम्ही ठेवू शकता.शेवटी आपली श्रध्दा महत्त्वाची, स्वामीं विषयी आपल्या मनात किती प्रेम आहे हे महत्त्वाचं आहे. आहे  

 


स्वामी आपल्यासोबत आपल्या पाठीशी नेहमी आहेत. त्यांच्या कृपेने च सगळ होत असते विश्वास ठेवा.


स्वामीभक्त स्वामीमय होवूयात

अशक्य ही शक्य करतील स्वामी

नयना सचिन खरात 



No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...