अधिक मास 2023 मध्ये काय करावे काय करू नये/ अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय/ तुळशीचा प्रभावी उपाय/काय दान करावे/भगवान विष्णूची कोणती सेवा करावी?


 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏

आज मी तुम्हाला अधिक मास मध्ये काय करावे काय करू नये/
अधिक महिन्यात कोणती सेवा करावी/ लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा/ तुळशीचा  प्रभावी उपाय लक्ष्मी घरात स्थिर होण्यासाठी, अलक्ष्मी ,रोगराई ,दरिंद्रता घरातून जाण्यासाठी/अधिक महिन्यात काय दान करावे हे सांगणार आहे

अधिक मासला 2023 / पुरुषोत्तम मास 2023 /मलमास 2023 किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात.2023 ला अधिक मास हा 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 ला आला आहे.या महिन्यात भगवान विष्णुनची उच्च कोटीची सेवा करतात

अधिक मासात केलेले व्रत- वैकले,उपवास, दान, धर्म ,उपासना ,नामस्मरण, पूजा,यज्ञ, हवन, ध्यानधारणा, पोथीवाचन, श्रवण,यामुळे पापांचा क्षय होतो. जसे या महिन्यात लेक आणि जावई यांना घरी बोलावून धोंड्याच जेवण केलं जाते.आणि यथाशक्ती जावयाला वाण देण्याची परंपरा आहे.आणि लेक आणि जावई यांना लक्ष्मी नारायण समजून त्यांची पूजा केली जाते. असे केल्यामुळे आपल्याला पुण्य ची प्राप्ती होते आणि धोंड्याच जेवण घातल्या मुले धोंडे दान केल्याचं पुण्य ही मिळतें.








1) अधिक महिन्यात काय करावे आणि काय नाही करावे=
अन्न प्राशन सोहळा,नामकरण सोहळा, नित्य कर्मे करावीत, ज्वर शांती, ग्रहण श्राद्ध, जातकर्म करावीत.

2) अधिक महिन्यात काय करू नये=
कोणतीही शुभ कार्य या महिन्यात करू नये. वास्तूशांती, गृहप्रवेश, देव प्रतिष्ठापन, खरेदी विक्रीचे व्यवहार, करू नयेत.

अधिक महिन्यात उपवास करणे याला देखील अनन्य साधारण असे महत्त्व आहे.आपल्याला एकभुक्त राहील पाहिजे. म्हणजे फक्त एकाच वेळी जेवण करणे ,आणि फळा आहार करणे.पण प्रत्येकाने आपल्या शारीरिक दृष्टीने जस सोयीस्कर होईन तस करावे. या महिन्यात मांसाहार हा पूर्ण पणे वर्ज्य करावा.

या महिन्यात जेवताना आपल्याला मौन धारण करायचे आहे

अधिक मास याला त्यागाचा महिना अस देखील बोललं जात.तर तुम्हाला या महिन्यात तुमची आवडती एखादी वस्तू दान करायची आहे.जसे की चहा, कॉफी इत्यादी.
 
अधिक मास मध्ये गंगा स्नान ला देखील खूप महत्व आहे.म्हणून जमल्यास महिन्यातून एकदा गंगा स्नान जरुर करावे

अधिक मास मध्ये काय दान करावे=
अधिक मास मध्ये तुम्ही अन्नदान करू शकतो आपल्याला सहज शक्य होईन तस 
गाईला चारा किंवा पोळी देवू शकता

आणि आपल्याला दीपदान करायचे आहे. या महिन्यात दीपदान ला अनन्य साधारण असे महत्व आहे आपण
आपल्या क्षमतेनुसार दीपदान करायचे आहे जसे की चांदीचे दिवे, स्टीलचे दिवे, पितळाचे दिवे, अगदी मातीचा दिवा ही आपण दान करू शकतो

अधिक महिन्यात तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मी च्या समोर शुद्ध तुपाचा अखंड महिनाभर दिवा लावायचा आहे. हा खूप च असा प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी.

अधिक मास मध्ये तुळशी पूजनाला ही अत्यंत महत्व आहे. आपल्याला रोज तुळशी समोर दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा आणि  त्यात दोन लवंग दोन काळी मिरी टाकायची आहे ज्याने आपल्या घरातून रोगराई ,अलक्ष्मी जाईन  घरात लक्ष्मी नांदेन
घरात लक्ष्मी चा अखंड वास राहीन ,धनधान्य, पुत्रसौख्य, आरोग्य लाभेल .
अश्या प्रकारे अधिक मास मध्ये तुम्ही छोटे छोटे  उपाय नक्की करा 
असे म्हणतात की अधिक मासात हे उपाय पोथीवाचन केल्यामुळे आपल्याला मोक्ष ची प्राप्ती होते आणि केलेल्या पूजेचे फळ कित्येक पटीने जास्त मिळते

अधिक महिन्यात विष्णूंची कोणती सेवा करावी

अधिक महिन्यात आपण विष्णू भगवान आणि त्यांच्या कोणत्याही एका अवताराची पूजा करायची आहे
श्री कृष्ण कथा, विष्णू सुक्त, विष्णू सहस्त्रनाम, श्री भागवत कथा ,
आणि कमीत कमी एक माळ 108 वेळा आपल्याला 
ॐ‌ नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करायचा आहे.
अश्या प्रकारे जर तुम्ही विधी पूर्वक सेवा केली तर विष्णू भगवान तुम्हाला नक्कीच आशिर्वाद देईन आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईन

या पेज वर सांगितलेले सगळ्या बाबी या शास्त्रावर आधारित आहेत.
कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही आहे

No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...