श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
मित्रांनो आज आपण कामिका एकादशी 2023 मध्ये कधी आहे,शुभ मुहूर्त व्रत पारण कधी आहे ,या एकादशीला काय खावे काय नाही, कामिका एकादशी ची संपूर्ण पूजा विधी आणि संकल्प कसा करावा, आणि विष्णूंची कोणती सेवा करावी हे. पाहणार आहोत.
कामिका एकादशी ला योगिनी एकादशी असे ही बोलतात. एकादशी व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. एकादशी चे व्रत केल्यामुळे आपल्याला सगळ्या सुखांची प्राप्ती होते. आणि जो व्यक्ती एकादशी चे व्रत करतो त्याला मोक्ष ची प्राप्ती होते.कृष्ण पक्ष मध्ये कामिका एकादशी चे व्रत करतात आणि 2023 मध्ये कामिका एकादशी हे व्रत 13 जुलै गुरुवार 2023 ला आले आहे.
एकादशीची तिथी आहे
12 जुलै संध्याकाळी 6.01 मिनिट
ते 13 जुलै 6.26 मिनिट पर्यंत आणि व्रताचे पारण 14 जुलै सकाळी 5.16 पासून ते 8.01 मिनिट पर्यंत राहणार आहे. म्हणून एकादशी चे व्रत 13 जुलै गुरुवार 2023 ला करावे
हे व्रत करण्या अगोदर तुम्ही मांसाहार करू नये
आता आपण पाहणार आहोत की
कामिका एकादशी ला आपल्याला काय करायचे आहे
तर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे
जो मनुष्य कामिका एकादशीला धूप ,दीप, नैवेद्य दाखवून विष्णू भगवान ची पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्ती होते.
आणि गंगेत स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत.
शिवाय विष्णूंना तुम्ही तुळशी पत्रे अर्पण केल्यामुळे सर्व पापांचा क्षय होतो. आणि आपल्याला कामिका एकादशी ची कथा सुध्दा ऐकायची आहे. ही कथा ऐकल्याने असे म्हणतात की आपल्या पाच पिढीच कल्याण होते.
तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि नित्य कर्मे आटोपून भगवान विष्णूंच्या फोटो समोर बसून संकल्प करायचा आहे.
हाता मध्ये जल घ्यायचे आहे.आणि मनातल्या मनात बोलायचं आहे की विष्णू भगवान सुख, शांती,समाधान आरोग्य, यासाठी आज मी हे एकादशी चे व्रत करणार आहे ,तुमची मनापासून सेवा करणार आहे ,तुम्ही माझ्या कडून हे व्रत करवून घ्या आणि मला या
व्रताचे शुभ फळ द्या.आणि ते जल तुम्ही भगवान विष्णूच्या चरणावर सोडायचे आहे.
त्यांनतर आपल्याला भगवान विष्णू चा फोटो स्वच्छ करायचा आहे आणि फोटोला हळद ,कुंकी केशर चंदन, लावायचे आहे,धूप,दीप, हार,फुले,नैवेद्य,तुळशी पत्रे, तीळ,दूध,पंचामृत , आणि भगवान विष्णूना पिवळा रंग खूप प्रिय आहे म्हणून पिवळी फुले, पिवळी मिठाई,फळे,तुम्ही ठेवू शकता याशिवाय माता लक्ष्मी ची ही पूजा करायची आहे आपल्याला तर माता लक्ष्मी ला प्रिय असणारे लाल फुल,कमळाचे फुल , आणि सफेद रंगाची मिठाई तुम्ही अर्पण करू शकता.
आणि आपल्याला त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे.आणि झाडाखाली दिवा प्रज्वलित करायचा आहे. एकादशी आणि द्वादशी ला तुळशी तोडू नये म्हणून अगादर च तोडून आणावी.
कामिका एकादशीला आपल्याला काय नाही खायचे= भात , मसूर ची डाळ वांगी ,कांदा लसूण हे खायचे नाही आहेत कारण हे तामसी पदार्थ आहेत,
काय खायचे ते आपण पाहणार आहोत=
दूध, फळे तुम्ही घेवू शकता पण आपल्या शारीरिक दृष्टीने जस सोयीस्कर होईन तसा उपवास धरावा या दिवशी उपवासाचे पदार्थ ही तुम्ही खावू शकता.
का एकादशी चे महत्व आता थोडक्यात सांगणार आहे.
तर एकदा काय झाले होते युधिष्ठिर ने श्री कृष्णाला कृष्णपक्षी एकादशी बद्दल विचारले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की या एकादशीला कामिका एकादशी असेही म्हणतात,जो मनुष्य कामिका एकादशी चे व्रत करेन तो मनुष्य सर्व पापातून मुक्त होईन
आणि विष्णू कृपेने त्या व्यक्तीला मोक्ष मिळेन आणि गंगेत स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईन
आता आपण पाहणार आहोत की
विष्णू भगवान ची कोणती सेवा आपल्याला करायची आहे
सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती अथरवशीर्ष बोलायचे आहे
श्री पुरुष सुक्त
श्री सुक्त
विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा
लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा
विष्णुसहस्त्रनाम
विष्णू भगवान चे पंचमंत्र
1)ॐ अं वासूदेवाय नमः
2) ॐ आं संकर्षणाय नमः
3) ॐ अं प्रद्युम्नाय नमः
4) ॐ अ: अनिरुध्याय नमः
5) ॐ नारायणाय : नमः
आणि एक माळ
ॐ नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा जप करायचा आहे
अश्या प्रकारे विधी पूर्वक तुम्ही
कामिका एकादशी चे व्रत केल्यास अकाल मृत्यूचे भय राहत नाही आणि मृत्यू नंतरही त्या व्यक्ती ला स्वर्गलोक ची प्राप्ती होते तुम्हाला सगळ्यांना
कामिका एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
या पेज वर उपलब्ध असलेली माहिती ही शास्त्राच्या आधारीत आहे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही आहे
No comments:
Post a Comment