श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दिवाळी निम्मित स्वामी समर्थ केंद्रातून आलेली उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा सांगणार आहे
सगळ्यात अगोदर सगळ्यांनी स्वामी समर्थ केंद्र मधून दीपावली संच आणायचा आहे कारण या मधल्या च वस्तू वापरून आपण सेवा करणार आहोत.
दीपावली संच मध्ये काय काय वस्तू असतात ते आपण पाहुयात
1) स्वामींचा आणि कुबेर यंत्र आणि श्री यंत्र यांचा एकत्रित फोटो
2) सुगंधी उटणे
3) विभूती
4) पंचगव्य
5) धूप
6) हिना अत्तर
7) गोमूत्र
8) गुलाब जल
9) कमल गट्टाचे मणी
10) पिवळी मोहरी
तर आता पाहुयात की आपल्याला सेवा काय करायची आहे
5 नोव्हेंबर ला सकाळी घरातल्या सगळ्यांनी सुगंधी उटण्याने अंघोळ करायची आहे
आणि 12 नोव्हेंबर ला तुम्हाला
पंचगव्याने अंघोळ करायची आहे.
त्यानंतर घरातल्या कुलस्त्रिने लक्ष्मी मातेला आवाहन करायचे आहे.आणि 5 नोव्हेंबर ला आपल्याला. कुंकुमार्चनक करून सेवेला सुरुवात करायची आहे .या अगोदर तुम्ही कुंकुमार्चन केले असेन तेच कुंकू तुम्हाला वापरायचे आहे.
कुंकुमार्चन करताना हातात लाल किंवा हिरव्या बांगड्या आणि साडी घालायची आहे.घरात स्त्री नसेन तर ही सेवा पुरुष सुध्दा करू शकतात.कुंकुमार्चन आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावार , अन्न पूर्णा मातेच्या मूर्तीवर ,आणि
श्रीयंत्रावर करायचे आहे.
आता कुंकुमार्चन ही सेवा फक्त 5 नोव्हेंबर ला च करायची आहे रोज नाही .
त्यानंतर 5 नोव्हेंबर पासून 12 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला रोज प्रवेशद्वार आपल्या मुख्य दरवाजा जवळ रोज पाण्यात हळद आणि गोमूत्र मिसळून शिंपडायचे आहे.आणि त्यांनतर गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म यांची रांगोळी काढायची आहे.रांगोळी वर रोज हळद, कुंकू, अक्षता,फुल वहायचे आहे ,धूप , दीप दाखवायचे आहे.
आणि रोज 5 नोव्हेंबर पासून रोज रात्री तुळशी पूजन केल्यावर देवासमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे.आणि रोज संध्याकाळी गोमूत्र शिंपडायचे आहे.
आता आपल्याला सेवा करायची आहे
तर आपण जो केंद्रातून दीपावली संच आणला आहे ना त्यात विभूती आहे
ही विभूती गुरुमाऊली जे यज्ञ करतात ना त्याची आहे खूप च प्रभावशाली आहे ही विभूती आणि पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि आपल्याला
11 वेळा वल्गा सुक्त
11 वेळा काळभैरव अष्टक
1 माळ श्री स्वामी समर्थ जप
म्हणायचे आहे आणि त्यांनतर आपल्याला सगळ्या घरात ते टाकायचे आहे याने आपल्या घराचं रक्षण होईन ,अलक्ष्मी घरातून निघून जाईन आणि लक्ष्मी ला निमंत्रण दिल्यासारखे होईन
त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे बघा आपण अलक्ष्मी घरातून निघून जावं यासाठी उपाय तर करतोय मग लक्ष्मी मातेला आवाहन करण्यासाठी काय करावे
तर आपल्याला कुलदेवी चा टाक , श्री यंत्र, अन्नपूर्णा मातेची मूर्ती या पैकी काहीही चालेन, घ्यायचे आहे आणि त्यांना अत्तर लावायचे आहे आणि मग 16 वेळा किंवा 1 वेळा श्री सुक्त बोलून तुम्हाला अभिषेक करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो मूर्ती घ्यायची आहे ,फोटो असेन तर नुसते अत्तर लावावे आणि मूर्ती असेन तर श्री सुक्त 16 वेळा किंवा 1 वेळा आणि पुरुष सुक्त बोलून अभिषेक करायचा आहे
आणि त्यानंतर हिना अत्तर लावायचे आहे.
आर्थिक प्रगतीसाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे.
आपण ज्या काही सेवा केल्या आहेत केंद्रातून मिळालेला धूप लावल्या नंतर,पिवळी मोहरी आणि रक्षा सगळ्या घरात टाकल्यावर ,गाईच्या तुपाचा दिवा लावल्या नंतर ,आपल्याला जो केंद्रातून दीपावली संच आपण आणला होता त्या मधल्या दोन कमळगट्याचे मणी आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहे आणि आपल्या
षोडशी मंत्र 16 वेळा
श्री स्वामी समर्थ 1 माळ जप
कमलात्मक मंत्र 1 माळ जप
करायचा आहे.ही सेवा करून झाल्यावर तुम्हाला ते मणी एका डबीत ठेवायचे आहे .असे तुम्हाला 5 नोव्हेंबर पासून 12 नोव्हेंबर पर्यंत करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 12 नोव्हेंबर ला अमावस्येला हवन करायचे आहे
हवन कुंड प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि त्या मध्ये शेणाची गवरी घ्यायची आहे आणि
11 वेळा श्री स्वामी समर्थ
24 वेळा गायत्री मंत्र
16 वेळा नवार्ण मंत्र बोलून शुद्ध तूप अग्नी मध्ये सोडायचे आहे. तोपर्यंत कमळ गट्ट चे मणी तुम्ही तुपात भिजवावे. त्यानंतर प्रत्येक मणी हा कमलाक्तमक मंत्राने अग्नी वर स्वाहा करायचा आहे. बघा या सेवेने वर्षभर पैशांची आवक राहील,आर्थिक अडचण भासणार नाही,मानसिक शांती प्राप्त होईन, अध्यात्मिक उन्नती होईन
स्वामी समर्थ केंद्रांनुसार ही सेवा सांगितली आहे.
कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा या पेज हेतू नाही आहे .भारतीय सण आणि परंपरा नुसार वरील माहिती देण्यात आली आहे
No comments:
Post a Comment