धनत्रयोदशी काय खरेदी करावे / काय करू नये धनतेरस 2023 ला काय खरेदी करावे काय करू नये

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏,


आज आपण पाहणार आहोत की धनतेरस च्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जात, आणि कोणत्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यात दरिद्रता येते,

 या वर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर 2023 ला आहे.


धनत्रयोदशीला आपण धन्वंतरी देवी आणि माता लक्ष्मी ची पूजा करतो.

या दिवशी काही वस्तू खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानल जात.






1) पितळ = समुद्र मंथनातून जेव्हा धन्वंतरी देवी जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिच्या हातात पितळाच्या कलशामध्ये अमृत होते.म्हणून धन्वंतरी देवीला पितळेच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. म्हणून धनत्रयोदशीला तुम्ही पितळेच्या वस्तू जरूर खरेदी कराव्यात.


2) चांदी आणि सोन्याची वस्तू = 

सोन्याच्या वस्तू ची खरेदी करणं हे देखील धनत्रयोदशीला अत्यंत शुभ मानल जात.

धनत्रयोदशी च्या चांदीच्या वस्तू, चांदीच्या लक्ष्मी आणि गणेश ची मूर्ती, दिवा, चांदीच नाणं, यांची खरेदी केल्यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.


3) केरसुणी किंवा झाडू= केरसुणी मध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो असे म्हणतात आपल्या घरातल्या नकारात्मक वस्तू साफ करून घरात सकारात्मक ऊर्जा केरसुणी घेवुन येते. म्हणून धनत्रयोदशीला केरसुणी नक्की खरेदी करा.


4) मातीचे दिवे = दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आहे. म्हणून धनत्रयोदशीला मातीच्या दिवांच्या खरेदी करणं हे शुभ मानलं जातं.


5) हळदीची गाठ = माता लक्ष्मी ला हळदीची गाठ ही अत्यंत प्रिय आहे. म्हणून धनत्रयोदशीला हळदीची गाठ जरूर खरेदी करा.


6) सप्तधान्य = धनत्रयोदशीला सप्तधान्य नक्की खरेदी करा.असे म्हणतात की धनत्रयोदशीला धान्य खरेदी केलं तर वर्षभर अन्न धान्याचा तुटवडा भासत नाही.







7) गोमुती चक्र, कवड्या, 

कमळगट्याच्या मणी = माता लक्ष्मी ला गोमिती चक्र , कवड्या आणि कमळाचे बीज हे अत्यंत प्रिय आहेत .म्हणून धनत्रयोदशीला जरूर खरेदी करा.


8) मीठ = धनत्रयोदशीला मीठ खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानल जात .या दिवशी मीठ खरेदी करून लक्ष्मी पूजन हे मीठ पाण्यात टाकून लादी/ फरशी पुसून घ्यावी.  


9) धने = धने म्हणजेच धन , म्हणून धनत्रयोदशीला धने जरूर खरेदी करावे.


10) फोटो किंवा मूर्ती = धनत्रयोदशीला गणेश आणि माता लक्ष्मी ची मूर्ती किंवा फोटो ,श्री यंत्र ,कुबेर यंत्र जरूर खरेदी करावे . असे म्हणतात की यांची खरेदी केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते.


11) नवीन वस्त्र = धनत्रयोदशीला कपडे खरेदी करणं हे देखील अत्यंत शुभ मानल जात. अगदीच नाही जमले तरी देवाच लाल वस्त्र तरी खरेदी करावं.


12) बत्तासे = माता लक्ष्मी ला बत्तासे अत्यंत प्रिय आहेत .म्हणून धनत्रयोदशीला बत्तासे जरूर खरेदी करावे.


13) शुभ चिन्ह = स्वस्तिक ,ओम, लक्ष्मी ची पावले , धनत्रयोदशीला या वस्तू नक्की खरेदी कराव्यात .हे अत्यंत शुभ मानल जात.


आता आपण पाहुयात की कोणत्या अश्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला धनत्रयोदशीला खरेदी करायच्या नाही आहेत.


लोखंडाच्या वस्तू = लोह हे शनी देवाच प्रतीक मानलं जात. म्हणू धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला लोखंडाची कोणतीही वस्तू घ्यायची नाही आहे.


अल्युमिनियम आणि स्टीलची वस्तू = या वस्तू हे राहू च प्रतीक मानलं जातं. म्हणून या वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं टाळावं.

या शिवाय चाकू, धारधार वस्तू, टोकेरी वस्तू, प्लास्टिक आणि काच यांच्या वस्तू ही शक्यतो या दिवशी खरेदी करू नये.


कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा या पेज चा हेतू नाही आहे.वरील माहिती भारतीय मूल्याच्या आधारे दिलेली आहे.

No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...