उत्पत्ती एकादशी व्रत/ उत्पन्ना एकादशी 2023 /Utpatti ekadashi vrat/Utpanna ekadashi vrat

 श्री स्वामी समर्थ, आज आपण उत्पन्ना एकादशी/ उत्पत्ती एकादशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

 यावर्षी 2023 मध्ये उत्पत्ती एकादशी ही 8 डिसेंबर शुक्रवारी आलेली आहे.

वैदिक पंचागानुसार

 एकादशी तिथी प्रारंभ 8 डिसेंबर शुक्रवार सकाळी 5.06 मिनिट ते

एकादशी तिथी समाप्ती 9 डिसेंबर शनिवार 6.31 मिनिट .


पूजेचा शुभ मुहूर्त 8 डिसेंबर

सकाळी 11.52 ते 12.34

व्रत पारण चा शुभ मुहूर्त

9 डिसेंबर दुपारी 1.16 ते 3.20 मिनिट.






उत्पत्ती एकादशी / उत्पन्ना एकादशी च व्रत हे मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षच्या एकादशीच्या तिथीला करतात.

या दिवशी भगवान विष्णू आणि देवी एकादशी ची पूजा करतात. या वर्षी

उत्पत्ती एकादशी ही दोन दिवसांची आहे. पौराणिक कथेनुसार या तिथीला देवी एकादशीची उत्पत्ती झाली होती.म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात.

जी व्यक्ती उत्पत्ती एकादशी चे व्रत पूर्ण श्रद्धेने करते तिचे सगळ्या पापातून मुक्तता होवून पुण्याची प्राप्ती होते आणि भगवान विष्णू आणि देवी एकादशी ची कृपा प्राप्त होते


प्रत्येक एकादशी च व्रत हे भगवान विष्णू ना समर्पित असते.या दिवशी सगळ्या नियमांचे पालन करून आपण व्रत केले तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात.आणि विष्णू भगवान आणि धन ची देवी माता लक्ष्मी चा आशिर्वाद प्राप्त होतो.


एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करताना पाण्यात हळद आणि गंगाजल टाकून स्नान करावे, उठून आपली नित्यकर्म आटोपून

आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे.देवघरात तुपाचा/ तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे

त्यानंतर विष्णू भगवान यांची मूर्ती असेन तर अभिषेक करावा, पंचामृत किंवा जल अभिषेक करावा. फोटो असेन तर गंगाजल ने पुसून घ्यावा.

भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा हार,फुले, फळ, आणि पिवळ्या रंगाची मिठाई भगवान विष्णूंना अर्पण करावी,.


भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मी ची ही पूजा आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मीला आपण लाल रंगाचं फुल आणि सफेद रंगाची मिठाई ,खीर यादिवशी जरूर अर्पण करावी.

त्यानंतर धूप दीप दाखवून यथासांग पूजा करावी. आरती करावी.





संध्याकाळी तुळशी मातेचीही पूजा करावी आणि दिवा प्रज्वलित करावा.


एकादशीच्या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलू नये,कोणाची निंदा नालस्ती करू नये, भगवान विष्णूंना एकादशी तुळशी पत्रे जरूर अर्पण करावी.

गरीब लोकांना दान जरूर करावे.

आणि कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी.


एकादशी च व्रत केल्यामुळे आपल्याला गंगेत स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते .

एकादशीला तुम्ही जर काही दान केलं तर 100 पट फळ तुम्हाला मिळते.

एकादशी च व्रत केल्यामुळे अश्वमेघ , तिर्थस्नान,दान केल्याचं पुण्या तुमच्या पदरात पडते अशी शास्त्रा नुसार मान्यता आहे.

 या दिवशी शक्यतो उपवास करावा, फलाहार करावा, पण ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत .त्यांनी तब्बेतीला सांभाळून व्रत करावे. तामसी पदार्थ सेवन करू नये. 


या दिवशी तुम्ही कोणत्या सेवा कराव्यात = 

एकादशीच्या दिवशी तुम्ही

एक किंवा 11 वेळा पुढीप्रमाणे सेवा कराव्यात

1) अथर्वशीर्ष

2) श्री पुरुषसूक्त

3) श्री सुक्त

4) रामरक्षा

5)गीतेचा 15 वा अध्याय 

6) व्यंकटेश स्तोत्र

7) विष्णू सहस्त्रनाम

आणि ॐ नमो भगवते वासुदेव नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे


अशाप्रकारे विधिवत पणे जर तुम्ही एकादशी च व्रत केले ,तर केलेल्या व्रताचे 100% शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईन.


कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा या पेजचा हेतू नाही आहे .वरील माहिती ही भारतीय संस्कृती परंपरा नुसार दिलेली आहे


श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...