अधिक मास 2023/पुरुषोत्तम मास 2023/ मलमास 2023/ धोंड्याचा महिना 2023/ जावयाला काय वाण द्यावे? अधिक मास कधी आहे?सौभाग्यवती जोडवी का बदलतात

 श्री स्वामी समर्थ ,


श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏


आज मी तुम्हाला अधिक मास 2023




कधीपासून आहे? जावयाचा मानपान कसा करायचा आहे. जावयाला वाण म्हणून काय द्यावे? किती वेळा द्यावे? सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात? हे सांगणार आहे


अधिक मास हा दर तीन वर्षांनी एकदा येतो .तो प्रामुख्याने चैत्र महिन्यापासून आश्विन महिन्याच्या दरम्यान असतो.या वेळी म्हणजे 2023 ला अधिक मास हा 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 ला आला आहे. 

अधिक मास ला पुरूषोत्तम मास /मलमास/ धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. 

या महिन्यात भगवान विष्णु ची उच्च कोटीची पुजा केली जाते. या महिन्यात दान ,धर्म करणे खूप शुभ मानले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूं च्या कोणत्याही एका अवताराची किंवा सगळ्या अवताराची या महिन्यात पूजा केली जाते.अधिक मास हा श्रावण मध्ये सुरू होणार आहे.म्हणून शिव भक्तांना महादेवाची पुजा करायला जास्त वेळ मिळणार आहे.


अधिक मासात केलेले व्रत, वैकले, उपासना, दान, नामस्मरण,पूजा यज्ञ, हवन, ध्यानधारणा याने आपल्या पापांचा क्षय होतो.आणि आपल्याला

पुण्य प्राप्त होते.







अधिक महिन्यात आपल्याला विष्णूंची

मनापासून पूजा करायची आहे.


आता अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे.चला पाहू की जावयाला काय वाण द्यावे?


अधिक महिन्यात आपण लेक आणि जावई यांना घरी जेवायला बोलवत असतो. त्यांचा मानपान करत असतो.

तर जावयाला वाण देताना.

आपण सोन्याच्या, चांदीच्या, स्टीलच्या,पितळेच्या वस्तू आपल्या क्षमतेनुसार आपण दान देवू शकतो.


पण शास्त्रा नुसार असे म्हणातात की छिद्र असलेल्या वस्तू जाळी असलेल्या वस्तू च दान करणं हे खूप च शुभ आहे.

जसे की मैसूर पाक, अनारसे, बत्तासे,


तर लेक आणि जावई यांना घरी जेवायला बोलवायचं आहे.त्यांचा मानपान करायचा आहे.

लेकीला साडी चोळी घ्यायची आहे.जावई ला कपडे करायचे आहे.


आणि त्यांना धोंड्याच जेवण खायला द्यायचं आहे. तर धोंड्याच जेवण म्हणजे जस नागपंचमीला आपण पुरणाचे दिंडी करतो .अगदी तसेच आपल्याला धोंडे बनवायचे आहेत फॅक्त हे धोंडे जरा चौकोनी बनवायचे आहे.


असे धोंड्याचे जेवण आपण लेक आणि जावई ला दिले की आपल्याला धोंडे दान केल्याचे पुण्य मिळते.

धोंडे करताना आपल्याला धोंड्यात एखाद नाण,सोन्याची छोटीशी वस्तू, दगड ठेवायचा असतो.आणि खाताना जावई ला काय लागले ते विचारायचं असते. ही प्रथा आहे. आणि असे काही नसते की काय लागले नाण लागले तरी शुभ आणि दगड लागला तरी शुभ च असते.


आणि अश्या प्रकारे आपण लेक आणि जावई यांची लक्ष्मी नारायण मानून त्यांची यथासांग अशी पुजा करायची आहे. 

आपण आपल्या क्षमतेनुसार त्यांना दान करायचे आहे.सोन्याची च वस्तू ,चांदीची च वस्तू दिली पाहिजे असे काही नाहीं आहे.


आपल्याला शास्त्रानुसार छिद्र , जाळी असलेल्या वस्तू च दान करायचं आहे ,

मग आपल्याला 33 अनारसे , 33 बत्तासे, 33 मैसूर पाक असे कोणतीही वस्तू ती 33 घेवून च दान करायची आहे.


अधिक मास मध्ये केलेले दान हे कित्येक पटीने आपल्याला परत मिळते.

  

तर मित्रांनो या धोंड्याच्या महिन्यात तुम्ही सुध्दा असाच लेक आणि जावई यांचा मानपान नक्की करा🙏

तुम्हाला पुण्य प्राप्त होईन


हे कधी पर्यंत करायचे आहे तर

ज्यांचं नुकतंच लग्न झाले आहे आणि धोंड्याचा महिना आला असेन त्यांनी हिं प्रथा सतत 3, किंवा 5 वर्ष सुरू ठेवावी. हे सुध्दा आपल्यावर आहे आपल्याला करायचे असेन तर करू शकतो नाहीतर फक्त त्याच वर्षी केले तरी चालते.

हे फक्त नवविवाहित जोडपे यांसाठी च आहे.


सौभाग्यवती जोडवी का बदलतात 


तर अधिक महिन्यात प्रत्येक 

सौभाग्यवती ही जोडवी बदलते किंवा वाढवते... त्यांच कारण असे आहे की

 जोडवी हे पती आणि पत्नी यांना जोडण्याचं काम करते म्हणून तिला जोडवी म्हणतात. प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा पती पत्नी ने कायम एकत्र राहावे.म्हणून आई वडील अधिक महिन्यात लेकीला जोडवी करतात आणि त्या निमित्ताने आपल्याला जोडवी बदलायला मिळतात मार्केट मध्ये खूप सारे नवीन डिझाईन आलेले असते आपली ही तेवढीच हौस होते


तुम्ही ही अधिक महिन्यात लेक जावई ला घरी बोलवा धोंड्याच जेवण खायला घाला आणि तुमच्या क्षमतेनुसार मानपान करा


श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏


या पेज वर ची माहिती ही शास्त्राच्या आधारे सांगितली आहे.कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न आमचा हेतू नाही आहे🙏

कर्पूर होम स्वामींची अत्यंत प्रभावी सेवा 🙏🙏🙏🙏🙏

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏





कर्पूर होम का आणि कसा करावा?


स्वामीभक्त आज मी तुम्हाला स्वामींची. खूप जुनी आणि अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे.ही सेवा स्वामींच्या केंद्रातून दिली जाते .जे आमचे पूर्वज करत आलेले आहे. आणि सगळ्या स्वामी भक्तांना ही सेवा माहित च असेन



 


.पण जे नवीन सेवेकरी आहेत. किंवा ज्यांना ही सेवा माहित नाही त्यांच्या साठी मी आज ही सेवा सांगणार आहे.

कर्पूर होम का आणि कसा करावा?




* कर्पूर होम का करावा?

कर्पूर होम हा तंत्र शास्त्रेतील अत्यंत प्रभावी असा होम विधी आहे.

आणि हा विधी अगदी पुरातन काळा पासून आपले पूर्वज करत आलेले आहेत. 


1) आपल्या घरात सतत भांडण होत असेन.आणि घरात अशांतता पसरली असेन .कटकटी होत असतील


2) करणीबाधा बाहेरची बाधा असेन


3) घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेन किंवा एक झाले की दुसरे ,दुसरे झाले किं तीसरे अस सतत च आजारपण असेन


4) पेचप्रसंगी निर्णय जेव्हा आपल्याला घ्यायचा असेन जसे की तुम्हाला लग्नासाठी स्थळे आली आणि तुम्ही निर्णय नाही घेवू शकत. थोडक्यात काय तर तुम्ही जेव्हा दोन गोष्टी मध्ये निर्णय नाही घेवू शकत अश्या पेच प्रसंगी, आयुष्याच्या कठीण प्रसंगी कर्पूर होम करावा.



* कर्पूर होम केव्हा पासून सुरू करावा?


तर आपण कर्पूर होम हा अमाव्यसेपासून किंवा पौर्णिमेपासून सुरू करू शकतो.


* कर्पूर होम कसा करावा?


आपल्याला एक नारळ पूर्णपणे सोलून घ्यायचा आहे. आणि देवासमोर ठेवून आपल्याला त्याची स्थापना करायची आहे. जसे की मी नेहमी बोलते की कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपल्याला बाप्पाची पूजा करून आशीर्वाद घ्यायचा आहे.आणि त्यांनतर च आपल्याला सेवा करायची आहे.



कर्पूर होम करताना आपल्याला नारळावर का वडी ठेवायची आहे. मी भीमसेन कापूर च वापरते .तुम्हाला ही मी तोच कापूर चा वापर करायला सांगेन .त्याचा खूप च चांगला असा परिणाम दिसून येतो.

नारळावर आपल्याला कापराची वडी ठेवून प्रज्वलित करायची आहे.पहिली वडी संपताच दुसरी वडी ठेवावी आपल्याला कापूर विझून द्यायचा नाही आहे .असे आपल्याला 5/7/11 कापूर घायचे आहे. तुम्ही कितीही घेवू शकता 5 ,7 ,11 आणि आपल्याला आपल्या श्री स्वामी समर्थ अगदी हळूहळू जप करायचा नाही आहे ,अजिबात घाई करायची नाही आहे .मनापासून जप करायचा आहे.

अग्नीसमोर जप केल्यामुळे त्याचे फळ कित्येक पटीने वाढते.


आपण एकाच नारळावर हा होम करू शकतो. नारळ सुकला, तडकला,किंवा नारळातून आतून पाणी यायला लागले की तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा.


कर्पूर होम केल्यानंतर तुम्ही थोड्यावेळ शांत चित्ताने बसा.महाराजांचे स्मरण करा.तुम्ही ज्यासाठी कर्पूर होम केला आहे ते आपलं काम 100% होणार च आहे हा विश्वास ठेवा.तुम्हाला हळू हळू मार्ग दिसू लागतील.तुम्हाला दैवी अनुभव येईन. नक्कीच सकारात्मकता जाणवेल.


तुम्हाला ज्यावेळी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेन त्यावेळी नारळाची शेंडी देवाकडे करावी

आणि ज्यावेळी तुम्हाला स्वतःच्या हातून नकळत एखादी चूक घडली आहे.त्याची कबुली द्यायची असेन तर नारळाची शेंडी आपल्याकडे करावी



या कर्पूर होमाचे फळ कित्येक पटीने जास्त मिळते.स्वामी भक्त तुम्हाला स्वतःला कर्पूर होम केल्यानंतर एक सकारात्मक बदल जाणवेल. मी हे स्वतः केलं आहे. हे माझे अनुभवाचे बोल आहेत.आणि माझ्या आयुष्यात जसे स्वामी सेवे चांगले बदल झाले, कर्पूर होम मुले जे चांगले बदल झाले ते तुमच्या आयुष्यात पण व्हावे म्हणून ही प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे.


स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏


स्वामी भक्त स्वामीमय होवूयात

अशक्य ही शक्य करतील स्वामी




मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा या पेज चा उद्देश नाही आहे.केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातील.

गुरुपौर्णिमेपर्यंत 11 दिवसांची स्वामी महाराजांची प्रभावी सेवा🙏🙏🙏

 





श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏


स्वामी भक्त स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत.हीच स्वामी चरणी प्रार्थना.🙏

स्वामी भक्त आज मी तुम्हाला 11 दिवसांची गुरुपोर्णिमेनिमित्त महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा सांगणार आहे.या सेवेने  तुम्हाला सांगते की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला भेटेन.

नोकरी साठी, घरासाठी, लग्नासाठी, तुम्ही ही विशेष अशी महाराजांची सेवा करून शकता. आपल्या भक्ताच कल्याणासाठी महाराज हे नेहमी तत्पर असतात.सगळ्या संसाराचा भार स्वामीं वर आहे.महाराजांचं आपल्या कडे लक्ष आहे.

त्यांच्या कृपेचा लाभ होण्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे

गुरुपौर्णमेनिमित्त महाराजांची विशेष सेवा




 

१) सेवेला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे.तर असे म्हणतात की महाराजांची कोणतीही सेवा ही संकल्पा शिवाय पूर्णच होत नाही.तुम्ही संकल्पा शिवाय सेवा केली तर त्याच फळ तुम्हाला मिळणार नाही.म्हणूनच तुम्हाला संकल्प करायचा आहे.


2) महाराजांना संकल्प कसा करावा?


सेवेच्या पहिल्या दिवशी हा संकल्प करायचा आहे.तुम्हाला महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसायचे आहे.आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे.आणि डाव्या हाताने उजव्या हातामधे तुम्हाला ते पाणी घ्यायचे आहे आणि तीन वेळा तुम्हाला


ॐ केशवाय नम:

ॐ नारायणाय  नमः

ॐ माधवाय नमः 

असे बोलून तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचे आहे.

त्यांनतर पुन्हा तुम्हाला हातात पाणी घ्यायचे आहे आणि हाताखाली तूम्हाला ताम्हण ठेवायचे आहे आणि हातावर तुम्हाला पाणी,अक्षता  आणि फुल घ्यायचे आहे.आणि संकल्प करायचा आहे की महाराज आज पासून मी 11 दिवसांची तुमची  तुमचे नाव (______)  माझे गोत्र(______) सेवा करणार आहे. तुम्हीच माझे कर्ता आणि करविता आहात. तुम्हीच आता माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या.आणि तुम्हाला ताम्हणात पाणी सोडायचे आहे.

रोज तुम्हाला संकल्प करायचा नाही आहे.







3) आपल्याला करावयाच्या सेवा=


1 ) तुम्हाला सगळ्यात  अगोदर गणपतीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अगोदर स्वामी स्तवन बोलायचे आहे


२)स्वामी चरित्रसारामृत चे 21 अध्याय   

तुम्हाला रोज एक पाठ करायचा आहे


3) 11 माळी श्री स्वामी समर्थ  असा जप तुम्हाला करायचा आहे


4) 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे.

आणि ही सेवा करताना तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवायचे विसरू नका कारण हे तीर्थ तुम्हाला पूजा झाल्यानंतर सगळ्या घरात तुळशीच्या पानाने शिंपडायचे आहे.आणि घरातील सगळ्यांनी ते ग्रहण करायचे आहे.


*आता आपण गुरुपौर्णिमेला महाराजांना गुरुपद कसे द्यावे ते पाहणार आहोत.



गुरुपौर्णिमेला तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. आणि तुमची सगळी नित्य कर्मे आटोपून तुम्हाला महाराजांन जवळ बसायचे आहे.


तुमच्या जवळ महाराजांचा मूर्ती असेन तर त्या मूर्तीला तुम्हाला अगोदर जल अभिषेक करायचा आहे. त्यानंतर  पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग महाराजांना पुन्हा अष्टगंधाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्त आणि 16 वेळा श्री सुक्त बोलायचे आहे आणि नाही जमले तर कमीत कमी 1 वेळा तरी नक्की बोला .

त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. आणि मग त्यांना आसनस्थ करायचे आहे. महाराजांना त्यांचं आवडते हिनाअत्तर लावायचे आहे.आणि अष्टगंध लावायचा आहे. आणि आपल्याला दिवा , अगरबत्ती ,लावायची आहे. फुल वाहायची आहेत. 


आता आपण महाराजांना गुरुपद द्यायचे आहे.

एक नारळ  आणि त्यावर गुलाबाच फुल घ्यायचं आहे आणि तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की महाराज मी आज मनापासून तुम्हाला माझा गुरु मानतो.तुम्ही च माझे माता,पिता गुरू आहात,मी चुकलो तर मला दिशा दाखवा.प्रसंगी आई सारखं शिक्षा द्या ,पण माझा हात तुम्ही सोडू नका.जीवनाच्या या वाटेवर मला तुमची साथ हवी आहे.,तुम्ही च कर्ता आणि करविता आहात.तुम्ही ब्रम्हांडनायक आहात.,सगळी सृष्टी तुमच्या आज्ञेनेच चालते .मी आजन्म तुमची सेवा करणार आहे. स्वामी राया तुम्ही ही सेवा माझ्या कडून करू घ्या आणि माझा शिष्य म्हणून स्वीकार करा तुम्ही नारळ आणि गुलाब घेवून मठ किंवा केंद्रामध्ये ही जावू शकता पण शक्य नसेन तर अश्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही महाराजांना गुरूपद देवू शकता.


11 दिवसांची सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेला सुद्धा करायची आहे .आणि 11 दिवस रोज तुम्हाला तुम्ही घरात जे काही बनवाल त्याचा नैवेद्य स्वामीं पुढे ठेवायचा आहे.

11 दिवसात  मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे. आणि पूजेची सांगता ही अगदी सोपी आहे. तुम्ही स्वामींना मनापासून सेवा करून घेतली म्हणून त्यांचे आभार माना.आणि गोडाचा नैवेद्य करा,आरती करा. स्वामींना नैवेद्य दाखवा. 


अश्या पद्धतीने तुम्ही 11 दिवसांची सेवेची सांगता करू शकता





श्री स्वामी समर्थ

स्वामी भक्त स्वामीमय होवूयात


अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏

वट पौर्णिमा संपूर्ण पूजा विधी ,साहित्य,शुभ रंग ,शुभ मुहूर्त ..

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

वट पौर्णिमेची साधी सोपी पूजा कशी करायची ते मी आज सांगणार आहे, तर सर्वात अगोदर ज्येष्ठ पौर्णिमा हि वट पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात.पुरातन कथेप्रमाणे सावित्री ने यमा सोबत चर्चा आणि आपल्या नवऱ्याची सेवा ही वडाच्या झाडाखाली केली आणि यमा कडून आपल्या पतीचे प्राण परत आणले.म्हणूनच वट पौर्णिमेला सुवासिनी वट वृक्षाची पूजा करतात. सुवासिनी ने पिवळा रंग ,लाल रंग , गुलाबी रंग या रंगाची साडी परिधान करावी .आपल्या लग्नाची साडी असेन तर अती उत्तम. आणि काळी पांढरी साडी शक्यतो नेसू नये.

 शुभ मुहूर्त 3 जून 2023 शनिवार 

वट पौर्णिमा सकाळी आणि दुपारी शुभ मुहूर्त आहे.

सकाळी 7.07 वाजल्यापासून ते 8.51 पर्यंत.हा शुभ आणि उत्तम मुहूर्त आहे

आणि दुपारी 12 .19 ते संध्याकाळी 5.31 मिनट पर्यंत मुहूर्त   आहे आणि वडाच्या झाडाला फेरी मारताना तुम्ही हा मंत्र म्हणावा .

वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन

वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्निता ||.


अगोदर वडाच्या झाडाचे महत्त्व जाणून घेवू.




 1) वडाच्या झाडाचे महत्त्व=

वडाचे झाड हे दीर्घायुष्य असते.

वडाच्या झाडाच्या मूळांमध्ये ब्रह्मा , झाडामध्ये विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान शिवाचा वास असतो.म्हणून हे झाड त्रिमृर्तींचे प्रतीक मानले जाते .


2) पुजे साठी लागणारे साहित्य=

सौभाग्याचे लेणे

हळदी कुंकू

कापसाचे वस्त्र 

विड्याची पाने 2

1 सुपारी

ताट 

तांब्या भरून पाणी

साखर 

पाच फळे

नारळ ब्लाऊस पिस

पाच सुवासिनी ची ओटी भरायला 

पाच आंबे आणि गहू 

दिवा,धूप , अगरबत्ती, कापूर ,

पंचामृत किंवा दुध ,

सुताचा धागा 

गूळ खोबरे इत्यादी...


3) वट पौर्णिमेची पूजा कशी करायची= वट पौर्णिमेला सुवासिनी व्रत करतात .काही पूर्ण वेळ करतात तर काही पूजा करेपर्यंत. तुमची जशी प्रथा असेन तसे करावे . सकाळची आपली नित्य क्रम करून ,देवाची पूजा करून ,आपल्याला वडाच्या झाडाखाली पूजा करायला जायचं आहे.आपल्याला संकल्प करायचा आहे की माझ्या पतीला आणि माझ्या परिवाराला दीर्घ आयुष्य ,निरोगी आयुष्य दे.आणि मग आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे . हळद कुंकू ,फुले ,अक्षता अर्पण करायची आहे.कारण कोणतीच सेवा ही दीप प्रज्वलित केल्याशिवाय पूर्ण होत नाही .त्यानंतर आपल्याला दोन विड्याची पाने एकत्र घेवून त्यावर गणपतीची ही स्थापना करायची आहे. कारण कोणतीही पूजा करताना गणपती बाप्पा ची पूजा करणे अनिवार्य आहे. हळद ,कुंकू , फुले,अक्षता, दाखवून आपल्याला बाप्पा चा आशिर्वाद घ्यायचा आहे. गूळ ,खोबरे,साखर यांचा नैवद्य दाखवायचा आहे.

त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला पाणी घालायचे आहे. त्यानंतर दूध किंवा पंचामृत ही घालायचे आहे. आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. हळद ,कुंकू ,अक्षता,फुले, वाहायचे आहे.आणि आणि वडाला फुलांचा हार ,कापसाचे वस्त्र घालायचे आहे.


त्यानंतर तुम्हाला धागा ,दोरा घ्यायचा आहे आणि तो वडाच्या फांद्याला अडकून तुम्हाला 7 किंवा 3 वडाच्या झाडा भोवती फेऱ्या मारायच्या आहेत. 


त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे. नारळ बलाऊस पिस घेवून नारळ वर हळद कुंकू अक्षता वाहून आपण जशी ओटी भरतो तशी च ओटी भरायची आहे.सौभाग्याचं लेण ही ओटीत ठेवायचे आहे.आणि कोणतीही पाच फळे ही तुम्हाला सुवासिनीच्या ओटी मध्ये घालायची आहेत.

किंवा आंबे आणि गहू ने ही ओटी भरली तरी चालेनं.

त्यानंतर वट वृक्षाची आरती करावी. वट सावित्री ची कथा वाचावी, धूप, दीप ,अगरबत्ती दाखवावे.आणि गोडा धोडाचा नैवद्य दाखवावा. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी,निरोगी आरोग्यासाठी,सोबत आपल्या परिवाराच्या ही दीर्घ ,निरोगी आयुष्यसाठी प्रार्थना करावी.


श्री स्वामी समर्थ

स्वामी भक्त स्वामीमय होवूयात..

अशक्य ही शक्य करतील असे 🙏🙏🙏

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत.


आज मी तुम्हाला स्वामींची अत्यंत प्रभावी अशी सेवा सांगणार आहे.जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईन. 

आज मी तुम्हाला पंचमहायज्ञबद्दल सांगणार आहे. पंचमहायज्ञ कसे करतात.आणि त्याने काय होते. तर स्वामी भक्त हो आपल्या हिंदू धर्मातील पंचमहायज्ञ हेव खूप महत्वाचं मानतात. पंचमहायज्ञ केल्याने माणसाच्या आयुष्यात सुख आणि येते.जीवनात भरभराटी येते ,आनंद, सुख ,समाधान येते. 







पंचमहायज्ञ म्हणजे पाच यज्ञ असतात.

1) देवयज्ञ

2) पितृयज्ञ

3) ऋषीयज्ञ

4) मनुष्ययज्ञ

5) भूतयज्ञ

 

सगळ्यात अगोदर आपण देवयज्ञ बद्दल पाहणार आहोत. 


1) देवयज्ञ = एका कागदाचा तुकडा त्यावर तूप लावून पेटवून देणे . थोडक्यात काय तर अग्नी ला तूप देणे हा झाला देवयज्ञ.

2) पितृयज्ञ= पुरातन काळापासून आपण कावळ्याला च पित्रांच प्रतीक मानतो. आपल्या घराच्या खिडकीत एखादा कावळा आला की आपण .बोलतो की आपले पूर्वज आले.तेव्हा आपण त्यांना चपाती ,किंवा काहीतरी खायला देतो. तर असच आपल्याला करायचे आहे.आपल्याला रोजच्या जेवणातील एक घास, किंवा एक चपाती कावळ्याला द्यायची आहे.हे झालं पितृयज्ञ.आपले पितर तृप्त होऊन आशीर्वाद नक्कीच देतील.


3) ऋषीयज्ञ= आपल्या रोजच्या जेवणातला एक घास, किंवा एक चपाती गायी ला देणे हा झाला ऋषीयज्ञ.गायी ला रोज जेवण देणे या सारखं पुण्याचं दुसरं काही काम नाही आहे.कारण बोलतात ना 33 कोटी देव राहतात गायीच्या पोटात.गोमाता प्रसन्न होवून आशिर्वाद देईन.


4) मनुष्ययज्ञ= आपल्याला रोजच्या रोज एका गरिब मनुष्याला जेवण द्यायचे आहे.आता तुम्ही म्हणाल की आम्हाला शक्य नाही होत .कामाची गडबड असते.तर अश्या वेळी काय करायचे की लहान मुलांना सुध्दा तुम्ही चॉकलेट ,बिस्कीट देवू शकता .आपल्याला काय करायचे आहे की एखाद्या मनुष्याचा आत्मा तृप्त करायचा आहे. अन्नदान करायचे आहे.जेवण दिले तर उत्तमच पण नाही दिले तरी लहान मुलांना तुम्ही एखाद चॉकलेट द्यावं.


5) भूतयज्ञ= भूतयज्ञ म्हणजे आपल्याला रोज मुंगी ला साखर द्यायची आहे.रोज एखाद्या झाडाखाली , एखाद्या कोपऱ्यात थोडीशी साखर ठेवावी. जेणे करून मुंग्या ते खातील.





स्वामी भक्त अश्या प्रकारे हे आहेत पंचमहायज्ञ हे केल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप सकारात्मकता येईन. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. असे काही जास्त लागणार नाही आहे.  

एखाद्या कागदाला तूप लावून पेटवणे झाला देवयज्ञ. 

कावळ्याला एखादी चपाती दिली एक घास दिला रोजच्या जेवणातला की झाला पितृयज्ञ. 

 गोमातेला रोजच्या जेवणातला एखादा घास दिला की झाला ऋषीयज्ञ.

गरीब मनुष्याला रोजच्या जेवणातला एखादा घास दिला की झाला आपला मनुष्ययज्ञ

आणि मुंग्याना थोडी साखर दिली की झाला भूतयज्ञ 


तुम्ही हा पंचयज्ञ करा तुमच्या आयुष्यात सुख, समाधान,आणि नव चैतन्य येईन.


श्री स्वामी समर्थ..


या ब्लॉग चा उद्देश कोणतीही अफवा पसरवण्याचा नाही आहे


स्वामी भक्त स्वामीमय होवूयात

अशक्य ही शक्य करतील स्वामी


स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...